केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांचे कर प्राप्त असलेले उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून टीका-टीपण्णीही सुरु झाली. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अर्थसंकल्पावर म्हणाले की, संघीय अर्थसंकल्प २०२५, विशेषतः १२ लाख रुपयांचा आयकर सवलत, चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी एक आर्थिक लॉलीपॉप असल्याचे खोचक टीका केली.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०२२-२३ मध्ये, फक्त २.२४ कोटी भारतीयांनी किंवा मध्यमवर्गातील सर्वात सामान्य लोकांनी आयकर भरला. मध्यमवर्गातील सर्वात खालचा वर्ग आयकर भरत नाही. आयकर सवलत ही बहुसंख्य मध्यमवर्गीयांना कशी मदत करेल, जे आयकर भरत नाहीत? हे लोक उपभोगावर जीएसटीच्या स्वरूपात कर भरतात असेही यावेळी सांगितले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कर सवलतीचे अर्थमंत्र्यांचे मोठे दावे बहुसंख्य मध्यमवर्गीयांना मदत करणार नाहीत आणि त्यांच्या खरेदी शक्तीत कोणतीही वाढ होणार नाही.तसेच, अर्थमंत्र्यांनी या बहुसंख्य लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत या मुद्याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उत्पन्न आणि खरेदी शक्तीत वाढ न झाल्याने, बहुसंख्य लोकांवर पूर्वीपेक्षा जास्त ओझे झाले आहे. यामुळे कर सवलत, वाढलेली खरेदी शक्ती आणि वाढलेला वापर याभोवतीचा गोंधळ केवळ एक विनोद बनतो, कारण त्यामुळे बहुसंख्य लोक बाजूला राहतील. पंतप्रधानांनी दिलेला उपाय हा वृत्तपत्रांसाठी एक चांगला मथळा आणि मध्यमवर्गासाठी एक तुष्टीकरण – एक लॉलीपॉप – असल्याची टीकाही यावेळी केली.
The #UnionBudget2025, especially the ₹12 lakh income tax rebate, is an economic lollipop to the anxious middle-class!
In 2022-23, only 2.24 crore Indians or the cream of the middle class paid income taxes. The bottom of the middle class does not pay income tax. How will the…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 2, 2025
Marathi e-Batmya