राज ठाकरे यांनी यांची स्पष्टोक्ती,… आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार विश्व साहित्य संमेलनाला हजेरी लावत व्यक्त केल्या भावना

मागील काही वर्षापासून मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणातील महत्वाचं नाव, पण त्यांच्या वाक्यचार्तुर्याचे आणि हजरजबाबीचे नेहमीच मराठी भाषिकांमध्ये कौतुक केले जाते. पुण्यात आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे ही हजर होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत बोलताना मराठी भाषा तुम्ही आम्ही सर्वांनी टिकवली पाहिजे असे सांगत इथे ज्या अभिनेत्यांना पुरस्कार मिळाले ते सर्वजण भाग्यवान आहेत. मात्र आमच्या वाट्याला तिरस्कारच मिळत असल्याचे विधान करत फटकेबाजी केली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुम्हा सगळ्यांच्या मनात आलं असेल की मी इथे कसा? हा कार्यक्रम शासनाचा आहे. मात्र मला उदय सामंत यांनी बोलावलं म्हणून मी आलो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच दर्शन झालं. त्याबद्दल मी उदय सामंत यांचे आभार मानतो. माझे मित्र रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हि सर्व माणसं भाग्यवान, मी पुरस्कार दिला म्हणून नाही. पण यांना-अभिनेत्यांना पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाट्याला तिरस्कार येतात. तिरस्कार घेऊन वाटचाल करावी लागते. सयाजी शिंदे यांनी सांगितले की आफ्रिकेतील माणसाशी त्यांनी मराठीत कसे भांडण केले ते. आपणाला आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे, त्यानंतरच जग तुम्हाला दाद देतं असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या देशातील माणसं त्यांच्या देशाशी आणि भाषेशी प्रामाणिक असतात. मग त्यांचा अभिमान आपल्यालाही वाटायला लागतो की ते किती त्यांच्या भाषेशी प्रामाणिक आहेत. आपल्या देशातील दुसरे राज्य जर त्यांच्या भाषेबाबत एकढा अभिमान बाळगत असेल तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलतो असा सवाल करत एकमेकांना भेटल्यावर आपण दुसऱ्या भाषेत का बोलतो, आता कार्यक्रमात राज्यगीत लागलं होतं मग दुसऱ्या राज्यात कोणत्या राज्याचं गीत आहे का असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ज्या हिंद प्रांतावर ज्यांनी राज्य केलं ते फक्त मराठ्यांनी केलं. ज्यांनी राज्य केलं त्या राज्यांची भाषा आपण जपायची नाही तर कोणी जपायची असा सवालही करत उदय सामंत यांनी सांगितलंय की, मराठी भाषेसाठी जे जे सांगाल ते राज ठाकरे यांना आश्वासन दिलं की, मराठी भाषेसाठी तुम्ही जे सांगाल ती मदत करू म्हणून. पण आमच्यावर गुन्हे दाखल करून असे सांगत आतापर्यंत आम्ही जे करत आलोय ते मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी करत आलोय असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *