Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सवाल, मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ? नरेंद्र मोदी यांनी स्वतःची तुलना थेट देवाशीच करण्यावरून साधला निशाणा

लोकसभा निवडणूकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार काल ३० मे रोजी थंडावला. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद मेमोरियल येथे ध्यान धारणेसाठी जाणार असल्याचे जाहिर केले होते. तत्पूर्वी लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा जन्म बायोलॉजिकल प्रोसेस मधून झाला नसल्याचे सांगत थेट परमात्मानेच भारतात पाठविल्याचे बिनबुडाचे विधान केले.

त्याचबरोबर भाजपा उमेदवारांसाठी आयोजित एका प्रचारसभेत बोलताना काँग्रेस जर सत्तेत आली हिंदूंचे हिसकावून घेऊन ते मुस्लिमांना देणार असल्याची धार्मिक ध्रुवीकरणाची वक्तव्ये करत प्रचारसभेत जाहिर वक्तव्ये केली. तर नुकतेच देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबत नरेंद्र मोदी यांनी कहर करत स्वतःच्या अकलेचे दिवाळे दाखवून देण्याच्या नादात गांधी चित्रपट येण्याअगोदर महात्मा गांधी यांना ओळखत नव्हते असे सांगत गांधी चित्रपट आल्यानंतर महात्मा गांधी यांची महती जगाला कळाल्याचे वक्तव्य केले. त्यातच काल सातव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नियोजित ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीला रवाना झाले. मात्र त्यानंतर त्यांच्या ध्यान धारणेचा नवा टेलिव्हिजन शो सुरु झाल्या सारखे सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्याचे प्रसारण सुरु झाले. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक्स या मायक्रोब्लोगिंग वरून निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही. अशी खोचक टीका केली.

प्रकाश आंबेडकर पुढे एक्सवर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते कोणाशी जोडण्यासाठी( कनेक्ट) ध्यान करत आहेत ? असा खोचक सवालही केला.

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1796419919841816972

Check Also

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *