Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची टीका, परदेशातील गोळीबारावर बोलायला वेळ, पण मणिपूरवर नाही भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का ?

मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

तसेच शेवटी आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, रविवारी (१४ जुलै) अमेरिकेतील बटलर, पेनसिलव्हेनिया येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आणि या घटनेचा निषेध केला. मात्र, मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगले आहे. किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवांच्या हत्याकांडाविषयी बोलायला किंवा मणिपूर येथे पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत नसल्याची खोचक टीकाही यावेळी केली.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *