प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांना सहभागी होण्यासाठी आमंत्रण छगन भुजबळ यांच्यानंतर शरद पवार यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आहे.

ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रित केले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही यात्रा मुंबई येथून २५ जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *