प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता?

सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की, चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना विचारले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आम्ही उमेदवार दिला नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या ५ जागांसंदर्भात चर्चा झालीय का ? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का ? अशी प्रश्नावलींचा यादीच शरद पवार यांच्यासाठी विचारली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हा महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा चालू होती. तेव्हा आम्ही एक मुद्दा मांडला होता की, आपण धर्मनिरपेक्ष मतांवर जिंकणार आहोत. त्यासाठी आपल्याला धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित करावे लागेल. पाच वर्षे भाजपासोबत जाणार नसल्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले पाहिजे, याचीही आठवण यावेळी करून दिली.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *