हरियाणामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरन कुमार यांनी सवर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केली, या घटनेने प्रशासनातील जातीय मानसिकतेचा चेहरा पुन्हा एकदा उघड केला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “हा संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना की, आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आली म्हणून आपल्याला कोणी हाथ लावू शकत नाही, हा फुगा आता फुटला आहे. आता या जातीयवादाच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.”
ते पुढे म्हणाले की, “पूर्वी ग्रामीण भागात मागासवर्गीयांवर खुलेआम जातीय अत्याचार होत होते; पण आता तेच अत्याचार प्रशासनातील उच्च पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांवर होऊ लागले आहेत. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.”
या घटनेमुळे प्रशासनातील दलित व मागासवर्गीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय व समानतेच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवस्थेतील दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हा धोका मांडला आहे.
हरियाणामध्ये पुरन कुमार या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला सवर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीवरून छळल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
हा संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना की, आपल्याला कोणी हाथ लावू शकत नाही, हा फुगा आता फुटला आहे. या सर्व परिस्थितीला तोंड द्यावे… pic.twitter.com/unuvjvaX9z
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 10, 2025
Marathi e-Batmya