Breaking News

पंतप्रधान मोदी यांचे सूचक विधान,…निवडणूक जम्मू काश्मीरचे भवितव्य ठरविणारी काँग्रेस नेते राहुल गांधी फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींवर केली टीका

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपाकडून प्रचारसभांचे घेत स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी येथील प्रचारसभेत बोलताना दहशतवाद शेवटची घटका मोजत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आज प्रचारसभा जम्मू काश्मीर मधील दोडा येथे झाली. या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच सभा झाली.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू आणि काश्मीरला परदेशी भूमीवरील दहशतवाद्यांकडून सातत्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले गेले. मात्र विद्यमान सरकारने स्विकारलेल्या भूमिकेमुळ परदेशी शक्तींनी निर्माण केलेल्या दहशतवाद आता शेवटच्या घटका मोजत असल्याची स्पष्टोक्ती देत विधानसभा निवडणूका जम्मू आणि काश्मीरचे भवितव्य ठरविणारी असल्याचे यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणूका हा राज्याचे भविष्य ठरविणाऱ्या आहेत. तसेच दहशतवादाला पाठिशी घालण्यांचा पराभव करणे आवश्यक असल्याचे आवाहन करत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला आणि पीडीपी नेत्या मेहबुबाब मुक्ती यांच्यावर टीकाही यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोडा येथील प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करताना म्हणाले की, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने मोहब्बत की दुकान असे म्हणत देशाची बदनामी केली. पण अमेरिकेत एका भारतीय पत्रकाराने यासंदर्भात प्रश्न विचारला तर त्याच्याबरोबर क्रुरपणे वागल्याचा आरोपही करत म्हणाले की, काँग्रेसवाले मोहब्बत की दुकान चालवत असल्याचा दावा करतात. परंतु आपल्या देशातील एका पत्रकाराला काँग्रेसने अमेरिकेत क्रुरपणाची वागणूक दिली. अमेरिकेमध्ये भारताच्या एका मुलगा अपमान केल्याची टीकाही यावेळी केली.

 

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *