महाराष्ट्रातील डबल इंजिनच्या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कामे केली आहेत. तसेच लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध विकासकामे करण्यात येत असून आज त्याच विकास कामाचा भाग म्हणून मुंबईच्या मेट्रो-३ चे उद्घाटन करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीवाल्यांना जनतेला देण्यात येत असलेल्या योजना पसंत नाहीत. त्यामुळे ते योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर केला.पं
मुंबईतील बीकेसीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीला मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या योजना नापसंत आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला देण्यात येत असलेला सरकारी पैसे देणेही मान्य नाही. त्यामुळे शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचा राग असून त्यासाठीच योजना बंद करण्याचा खटाटोप महाविकास आघाडी वाल्यांकडून सुरु आहे. जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते सर्वात आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना बंद करतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहनही यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी पैसा जनतेत वाटण्यास सुरुवात करून एकप्रकारे लाभ देण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र या महाविकास आघाडीवाल्यांना जनतेत पैसा वाटण्यापेक्षा त्यांच्या कंत्राटदार आणि बोगस लोकांच्या हाती पैसा देण्याचा उद्देश असल्याचा आरोपही केला.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत सुरु होणारी भूमिगेत मेट्रो प्रकल्पाला अचानक आमचे उद्धोजी राव यांनी स्थगिती दिली. आणि आरेतून जाणारा मेट्रो प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलविला. त्यांनी हा निर्णय कोणाच्या इशाऱ्यावर घेतला का घेतला याबाबतची काही कळायला मार्ग नव्हता. पण त्यांचा इगो जागा झाल्याची आठवण सांगत शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारकडून करण्यात येत असलेली विकास कामे पाहुन विरोधकांना पोटदुखी होत आहे. मात्र आरोपींच्या टांगा पलटी आपण यापूर्वीच केल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya