राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जनतेला सत्य कळलं आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी नरेंद्र मोदीजींची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.
राफेल प्रकरणीच्या सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत, राहुल गांधींना माफी मागायला लावली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल करणे, आणि पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांची बदनामी केल्याबद्दल संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येत आहे. याअंतर्गत दादर येथील वसंत स्मृती येथे महाराष्ट्र भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होऊन, त्यांनी राहुल गांधींविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “स्वत:च्या स्वार्थासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो हे संपूर्ण देश पाहात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर खोटे आरोप करुन, जनतेची दिशाभूल केली. राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल केल्यामुळे देशातल्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे.”
मुंबई भाजपचे महामंत्री सुनिल राणे, माजी मंत्री योगेश सागर, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी, राज पुरोहित, प्रवक्ते अतुल शहा यांच्या सह मुंबई महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *