राहुल गांधी यांचा विश्वास, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देणार जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना दिला विश्वास

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याचा असलेला राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रीय प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न हाणून पाडू आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला.

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. त्या निमित्ताने राज्यात एका जिल्ह्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर राज्याचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. येथील पैसा-अडका, रोजगाराच्या संधी जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांना देण्यात येत नाही. तर येथे बाहेरून आलेल्यांना ती संधी देण्यात येत आहे. या गोष्टी आता आम्ही घडू देणार नाही असेही यावेळी सांगितले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये आता इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी रस्त्यावरून ते विधानसभेत आणि विधानसभेतून थेट संसदेपर्यंत काढून घेण्यात आलेल्या राज्याचा दर्जा परत मिळवून देण्यासाठी लढाई पूर्ण ताकदीने लढू असा इशाराही यावेळी भाजपाला यावेळी दिला.

शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने काहीही करू द्या, पण राज्याच्या सत्तेवर येणारी इंडिया आघाडी जम्मू आणि काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देत येथील जनतेचे असलेले अधिकार आणि सन्मान मिळवून देणार असा विश्वासही यावेळी स्थानिकांना दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *