स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी शेवटून दुसऱ्या रांगेत मुख्य पहिल्या रांगेत मात्र सत्ताधारी मंत्री आणि ऑलिंम्पिक विजेते खेळाडू

भारतीय स्वांतत्र्याला आज ७८ वर्षे पूर्ण होत असून या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आतापर्यंत देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमाला आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि विरोधी पक्षातील सन्मानिय सदस्यांची नेहमीच पुढच्या रांगेत आसन व्यवस्था करण्यात येते. परंतु ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या ध्वजावंदनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पहिल्या रांगेऐवजी शेवटून दुसऱ्या रांगेत त्यांची आसन व्यवस्था करण्यात आल्याने राजकिय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

मागील अनेक वर्षाच्या प्रथेनुसार देशात काँग्रेसचे सरकार किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीचे असताना अनेक वेळा सत्ताधारी पक्षातील महत्वाचे मंत्री आणि विरोधी पक्षनेते किंवा विरोधकांमधील सन्मानीय नेत्यांना पहिल्या रांगेत स्थान दिल्याचे अनेकवेळा दिसले. त्यानंतर मध्यंतरीच्या काळाच पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही विरोधी पक्षाच्या खासदारांना आणि नेत्यांना नेहमीच सांसदीय कार्यप्रणालीतील संकेताप्रमाणे मान-सन्मान देण्यात आला. मात्र १० वर्षानंतर पहिल्यादाच लोकसभेत विरोधी पक्षनेते पद मिळाले.

देशाचा सर्वोच्च सोहळा असलेल्या १५ ऑगस्ट अर्थात ७८ वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकशाहीची शाब्दीक हमी देणाऱ्या भाजपाकडून विरोधी पक्षनेत्यांचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांसोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्थान दिले नसल्याचे दिसून आले.
त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांच्या आसन व्यवस्थेबाबत सातत्याने धांडोळा घेतला असता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निमंत्रितांच्या आसन व्यवस्थेतील शेवटून दुसऱ्या रांगेत करण्यात आल्याचे दिसून आले.

यासंदर्भात विविध प्रसारमाध्यमातून चर्चा उपस्थित करण्यात आली, त्यावेळी केंद्राच्या संरक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले की, पहिल्या रांगेत ऑलिंम्पिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची आणि केंद्रातील मंत्र्यांची आसन व्यवस्था करण्यात आल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आसन व्यवस्था मागून दुसऱ्या रांगेत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतचे अधिकृत ट्विट अद्यापपर्यंत तरी पाहण्यात आले नाही.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *