उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर राज ठाकरे यांच्या स्वागताला उद्धव ठाकरे स्वतः खाली आले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून पुन्हा एकदा आपपल्या मतदारांना गोंजारण्यासाठीचे निर्णय घेण्याचा सपाटा पुन्हा एकदा सुरु केला आहे. तर दुसऱ्याबाजूला मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधुनी एकत्र यावे अशी अपेक्षा मराठी जणांकडून व्यक्त करण्यात येत होती. नेमक्या याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत देत दोन्ही ठाकरे बंधूकडून युती करण्याचे संकेत दिले. त्यातच राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात या दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे राज्य सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

त्यातच आज रविवारी २७ जुलै रोजी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६५ वा वाढदिवस, या वाढ दिनाचे औचित्य साधत मनसे प्रमुख तथा उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे हे मातोश्री (उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) येथे जात उद्धव ठाकरे यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना खास भलामोठा पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी आपल्या खोलीत उद्धव ठाकरे कार्यकर्त्ये पदाधिकाऱ्यांकडून अभिष्टचिंतन स्विकारत असताना राज ठाकरे येत असल्याची माहिती मिळताच उद्धव ठाकरे हे स्वतः इमारतीच्या खाली उतरून राज ठाकरे यांचे स्वतः स्वागत केले. तसेच राज ठाकरे यांची गळाभेटही घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाची युती होणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्याचे चित्र मातोश्री परिसरात दिसून आले.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगल्याच्या खाली भेट झाल्यानंतर दोन्ही बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जात गेले. तेथे राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीला अभिवादन केले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर दोन्ही भावांचे मनोमिलन झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे दोन बंधू एकत्र येत त्यांच्यात मनोमिलन झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

या संदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, आज मला खुप आनंद झाला आहे अशी दोन शब्दात आपली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *