राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर १२ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकींतर्गत दिनांक १२ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील, तर २३ मार्च २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबाबत निवडणुकीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने आज प्रसिद्धीस दिली आहे.

उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला उमेदवारासाठीची नामनिर्देशनपत्रे कक्ष क्र. १, तळमजला,  विधानभवन, मुंबई येथे १२ मार्च २०१८ पर्यंत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळू शकतील. याच ठिकाणी व याच कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी विलास गो. आठवले किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष नलावडे यांच्या समक्ष उमेदवाराची नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी १३ मार्च २०१८ रोजी दुपारी १२ वाजता कक्ष क्र. ७१२, सातवा मजला, विधानभवन येथे करण्यात येईल.

उमेदवारी मागे घेण्याची सूचना उमेदवार किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाकडून किंवा उमेदवाराकडून लेखी अधिकार दिलेल्या निवडणूक अभिकर्त्याला १५ मार्च २०१८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास २३ मार्च २०१८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असेही निवडणुकीच्या सूचनेनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

 

About Editor

Check Also

आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय

पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *