रामदास कदम यांचा इशारा, बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून मागणी करणार तसेच अनिल परब यांना न्यायालयात खेचणार

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब यांनीही पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावरून रामदास कदम यांनी अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या विरोधात अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला. त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्र देत सीबीआय चौकशीची मागणी करण्याची मागणी करणार असल्याचे जाहिर करत माझ्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं नव्हतं तर स्टोव्हचा भडका उडाला होता असे स्पष्टीकरण दिले.

अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम म्हणाले की, मला वाटतं अनिल परब अर्धवट वकील असावेत, अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं आहे. मी दसरा मेळाव्यात बोललो होतो, त्यामध्ये डॉक्टरांचा उल्लेख केला होता. ते डॉक्टर बाळासाहेबांवर उपचार करत होते. मग त्या डॉक्टरांवरही देखील अनिल परब अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत का ? पैशांसाठी. कारण त्यांच्याकडे आता पैसे पडले असतील, मी निर्णय घेतला आहे की, या प्रकरणात सरकारने सीबीआयची चौकशी करण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खरंच ठेवलं होत का? याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून सीबीआय चौकशी करण्याची लेखी मागणी करणार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबांनी न्यायालयात जावं अनिल परबांना आपण काय बोलतोय याचं भान असावं. आम्ही सर्व नेते मातोश्रीपासून लांब झालो आणि त्यानंतर ते मातोश्रीचे मालक झाले का? अन्यथा अनिल परब कोण होते? मला वाटंत बाळासाहेबांच मृत्यू पत्र जे झालं त्यांचाही संबध असेल असा संशयही व्यक्त केला.

रामदास कदम पुढे म्हणाले की, अनिल परब साहेब चंद्रग्रहणाच्या रात्रो कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत आपण एक बकरा का? कारण तुमच्या सारखाच एक माणूस होता असं बघणाऱ्यांचं म्हणण आहे. तेव्हा बरोबर एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता आणि त्या गाडीत बकरा होता व दोन बाबा होता. त्या ठिकाणी माझं आणि योगेश कदम यांच नाव घेऊन कापलं असं त्यांना पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही, पण जर हे वास्तव असे तर ते चुकीचं आहे. याचाही अनिल परबांनी खुलासा द्यावा अशी मागणीही यावेळी केली.

अनिल परब यांना उद्देशून पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, तुम्ही हे सर्व थांबवा मी पक्षात नवीन नाही. मी काल देखील सांगितलं होतं की हे चेले चपाटे माझ्या विरोधात काय पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धव ठाकरे यांना माझं खुलं आव्हान आहे की याप्रकरणी बोलावं. अन्यथा मला या सर्व घटनेची चौकशी लावावी लागेल असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना रामदास कदम म्हणाले की, माझ्या पत्नीच्या संदर्भात अनिल परब जे बोलले आहेत. त्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. हे कसले लोक आहेत. एखाद्याच्या आई विरोधात किंवा पत्नीबाबत बदनामी करून राजकारण करतात. दोन स्टोव्ह होते, त्यामध्ये एका स्टोव्हमधून साडीला आग लागली आणि भडका उडाला तेव्हा माझ्या पत्नीला मी वाचवंल. त्यानंतर सहा महिने माझ्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र याबाबत जे बदनाम केले जाते आहे ना माझ्या विरोधात त्याविरोधात आम्ही त्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *