गृह मंत्री देशमुख म्हणाले, या ऑनलाईन चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला रझा अकादमीच्या तक्रारीवरून केंद्राला लिहिले पत्र

मुंबई : प्रतिनिधी
सध्या काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मुहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मात्र या चित्रपटामुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपट ऑनलाईन दाखविण्यावर बंदी घालावी अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहित केंद्रीय आयटी मंत्र्यांकडे केली.
मुहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाच्या ऑनलाईन रिजील करण्यासंदर्भात वादग्रस्त रझा अकादमीने गृह विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे त्यांनी केंद्राला पत्र लिहीत ही मागणी केली.
सध्या हा चित्रपट यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येत असून या ऑनलाईन संकेतस्थ‌ळावरून हा चित्रपट दाखविण्यास बंदी घालावी किंवा त्या संकेतस्थळावरून तो हटविण्यासंदर्भात कारवाई करावी अशी विनंतीही त्यांनी केली.
तसेच हा चित्रपट २१ जुलै २०२० रोजी या संकेतस्थळावरून प्रदर्शित करण्यात येणार असल्याने तत्पूर्वी यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *