संजय राऊत यांची घोषणा, अखेर आज महाविकास आघाडीचा विस्तार, हे पक्ष झाले सहभागी

महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी झालेली नसून राज्यातील आघाडी आता मजबूत झाली आहे. तसेच या आघाडीचा विस्तार झाला आज झालेला असल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जसे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी केल्याचे पत्र हवे तसे पत्र आंबेडकर यांना पाठविण्यात आले असून २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ते हजर राहणार असल्याचेही यावेळी जाहिर केले.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल संयुक्त पक्ष जरी इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला असला तरी राज्यात मात्र जनता दल संयुक्तचे नेते कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत. याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि तसेच एमआयएमचे आमदार रईस शेख हे ही सहभागी झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा आज विस्तार झाला असे मी जाहिर करतो असेही सांगितले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आज झालेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे हजर राहिले नाहीत. मात्र पुढील २ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहतील. तसेच आज झालेल्या बैठकीला महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे नेते नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. तसेच इतर पक्षाचे नेते आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित जेवण केल्याचे सांगत आज दिवसभर आम्हा सर्वांची खेळी-मेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या मागणीनुसार वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाली. तसेच रमेश चेन्नीथला यांनी जाहिर केल्याप्रमाणे महाविकास आघाडीत निमंत्रित करण्यासाठी आणि जागा वाटप करण्याचे अधिकार नाना पटोले यांना अधिकार असल्याचे अद्याप प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अद्याप जाहिर केले नाही, अशी नाराजीही यावेळी केली.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *