संजय राऊत रूग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाले,हात लिहिता राहिला पाहिजे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रूग्णालयात दाखल

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने मुंलुंड येथील फोर्टीस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट करत प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. तसेच काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट एक्सवर करत एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

मागील काही काळापासून संजय राऊत यांची प्रकृती ठिक नसल्याने ते सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयामध्ये अधून मधून त्यांना तपासणीसाठी नेण्यात येत होते. मात्र मंगळवारी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी तपासणी दरम्यान, त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या संजय राऊत यांची प्रकृती ठिक असून त्यांना पुढील पाच दिवस दिवसांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी दिली.

संजय राऊत त्यांच्या पोस्टमधून नेमके म्हणाले…

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीकेची दखल त्यांच्या पक्षाच्या विरोधकांवर घेण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नव्हता. पण तब्येतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल असतानाही त्यांचा शिरस्ता कायम ठेवला असून हाताला सलाईन लावलेली असताना हाती पेन आणि लिहिलेला कागद असा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनही दिलेला असून हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमिन, लिहिल त्याचे वृत्तपत्र आमच्या पिढीचा मंत्र होता असे सांगितले.

संजय राऊत यांच्या या पोस्टखाली त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंट करण्यात येत असून संजय राऊत यांनी लवकर बरे व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *