संजय राऊत म्हणाले, चंद्राबाबू – नितीशकुमार आज त्यांच्यासोबत तर उद्या आमच्यासोबत एनडीएसोबत सरकारमध्ये सामील होण्यावरून संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र

लोकसभा निवडणूकीनंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपा आणि एनडीएच्या खासदारांची आज संसदेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत एनडीएचे लोकसभेतील सभागृह नेते म्हणून खासदार नरेंद्र मोदी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोघे आज एनडीएला पाठिंबा देत आहेत. तर उद्या ते आमच्यात सामील होतील असे खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ९ जून रोजी सरकार स्थापन करू शकते, परंतु ते चालवणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासारखे नेते खरोखरच एनडीएचे प्रतिनिधित्व करतात का, असा सवाल उपस्थित करत एनडीएच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांची युती बदलू शकते असे सूचक वक्तव्यही केले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आज ते एनडीएला पाठिंबा देतात; उद्या ते आमच्यात सामील होतील, जेडी(यू) नेते आधीच भाजपाच्या अग्निपथ योजनेला विरोध करत आहेत आणि समान नागरी संहिता (यूसीसी) वर चर्चेची वकिली करत आहेत असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्येष्ठ जेडी(यू) नेते के.सी. त्यागी आणि तेलुगु देसम पार्टीचे सुप्रीमो चंद्रबाबू नायडू म्हणाले, पंतप्रधानांना राजकीय प्रचारादरम्यान जे काही सांगायचे होते, मग ते UCC असो वा अग्निवीर असो, त्याला त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधाचा सामना करावा लागला. उद्या राम मंदिराच्या मुद्द्यावरही विरोध होऊ शकतो. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल, असे मोदींनी सांगितले, तर चंद्राबाबू नायडू यांनी आरक्षणाची वकिली केली. मोदीजी काय करणार? अनेक मुद्दे चर्चेत आहेत. त्यांना सरकार बनवायचे आहे, त्यांना प्रयत्न करू द्या असेही खोचकपणे सांगितेल.

नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, भाजपा काँग्रेस मुक्त भारत (काँग्रेसमुक्त भारत) हे ध्येय बाळगत असताना, आम्ही ते बहुमत मुक्त भाजपा (भाजपा बहुमत मुक्त) केले आहे. असे असले तरी, भाजपाचे अजूनही सरकार स्थापन करण्याचे ध्येय आहे अशी टीकाही यावेळी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, कथित शेअर बाजार घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाला दुजोरा देताना म्हणाले की, अमित शाह शेअर बाजार व्यवहारात सक्रियपणे सहभागी आहेत; गृहमंत्रिपद स्वीकारल्यानंतरही त्यांनी शेअर मार्केटमध्ये लक्षणीय सहभाग कायम ठेवला. या घोटाळ्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देशातील “सर्वात मोठ्या शेअर बाजार घोटाळ्यात” “थेटपणे सहभागी” असल्याचा आरोप केला, जिथे किरकोळ गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि गुरुवारी चौकशीची मागणी केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) भाजपाच्या विरोधात जोरदार आघाडी उभी केली आणि बहुमत मिळवले, आगामी निवडणुकीतही तेच करण्याचे आमचे ध्येय आहे, किमान १८०-१८५ जागांचे लक्ष्य. आघाडीत मोठा भाऊ नाही; आम्ही सर्वांनी एकमेकांना आधार दिला. नाना पटोले असोत, शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, आम्ही एकत्र प्रचार केला आणि एकत्रितपणे जागा जिंकल्या असेही यावेळी स्पष्ट केले.

पश्चिम राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी या वर्षी ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका होणार आहेत.

About Editor

Check Also

राज्यात रॉकेल वितरणाचा मोठा निर्णय; प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर मिळणार मार्च महिन्यापासून रॉकेल वितरणाला सुरुवात पण लवकरच किंत जाहीर करणार, शासन आदेश जारी

एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात तात्पुरत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *