Breaking News

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता असंघटीत कामगारः वर्षभरात पुन्हा बदली राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील काही वर्षापासून सततच्या बदल्यांमुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली. वर्षभरात बदली झालेले तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.

राज्याच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी असलेले धीरजकुमार यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले असून केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व्ही. राधा यांची राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव, आणि रणजित कुमार यांची यशदाच्या अतिरिक्त महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे.

वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. मात्र वर्धा जिल्हा परिषदेच्या सीईओ पद रिक्त ठेवण्यात आले आहे. राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या संचालक निमी अरोरा यांची सहआयुक्त राज्य कर विभाग, मुंबई येथे तर पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अमन मित्तल यांची मित्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

राहुल गांधी यांचा पलटवार , मोदी-शाह यांचा राज्यघटनेवर हल्ला आणीबाणीच्या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पलटवार

१८ व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *