एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटील’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी किंवा चिमटे काढण्यासाठी या संवादाचा पुरेपूर वापर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य करत खोचक ट्विट केलं. तर अमोल मिटकरी यांच्या त्या ट्विटला तानाजी सावंत यांनी इशारा देत प्रत्युत्तर दिले.
यासोबत अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट सह तीन दिवसांची रोजीच्या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली आहे. ही कार्यक्रम पत्रिका आता समाज माधअयमांवर चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे.
अमोल मिटकरींनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्याची कार्यक्रम पत्रिकाच शेअर केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट यादरम्यानच्या पुणे दौऱ्याचं नियोजन नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये तानाजी सावंत २६ तारखेला दुपारी अडीच वाजता मंत्रालयातून पुण्याच्या दिशेने निघाले असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर २७ आणि २८ ऑगस्ट या दोन दिवसांत तानाजी सावंत यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त निवासस्थान ते कात्रज, बालाजी नगर येथील कार्यालये असाच प्रवास नमूद करण्यात आला आहे.
तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यावरून आता ट्रोलिंग सुरू झालं असून अमोल मिटकरींनी या दौऱ्याच्या नियोजन पत्राचा फोटो शेअर करत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “हे आहेत आमचे आरोग्यमंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! काय ते मंत्री? काय त्यांचं नाव? आणि काय त्यांचा दौरा? एकदम ओक्के ओक्के”, असं आपल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी नमूद केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य करत खोचक ट्वीट केलं आहे. याशिवाय, अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट २०२२ रोजीच्या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली असून, ही कार्यक्रम पत्रिका आता व्हायरल होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत यांनी इशारा दिला आहे.
पुणे पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शहरातील वाहतूक आणि अन्य प्रश्नाबाबत कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार मंत्री चंद्रकांत पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांच्याशी संवाद साधला.
मिटकरी यांच्या ट्विटवर तानाजी सावंत म्हणाले, मी शासकीय वाहनं वापरण्याच्या विरोधातच आहे. माझ्या स्वत:च्या गाड्या आहेत. मी शासनावर ताण येऊ नये म्हणून सुरक्षा देखील टाळतो आहे. आता संरक्षणाची गरज जनतेला आहे, काही दिवसांवर गणपती आलेले आहेत. कायदा-सुव्यवस्था नीट रहावी यासाठी सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे, त्यासाठी आता चर्चा केली आहे. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आता पुण्यात आहे.
“ते मला ट्रोल करत आहेत. हा त्यांचा मागील दहा-पंधरा दिवसांचा कार्यक्रम आहे. पण माझ्या वरिष्ठांनी मला काही सूचना केल्या आहेत. की तुम्ही बोलू नका, त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या त्यांच्या बोलण्यावर व्यक्त व्हायचं नाही. पण ज्या दिवशी मी व्यक्त होईल त्यावेळी मात्र पुन्हा आठ दिवस हंगामा माजलेला असेल, असं म्हणत तानाजी सावंत यांनी इशारा दिला.
हे आहेत आमचे आरोग्य मंत्री ! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम !!
" काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव ? आणि काय त्यांचा दौरा ??
एकदम OKK OKK pic.twitter.com/vWDIVntqlU— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2022
Marathi e-Batmya