शरद पवार यांचा आरोप, संविधान बदलण्यासाठीच यांना ४०० जागा पाहिजेत

आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू टाका असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.

सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार बोलत होते. या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे असे मतही यावेळी व्यक्त केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार अशी भाषणाला सुरुवात करतील. दिल्लीत सांगतात की शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत केली. बारामतीत येऊन म्हणतात बोट धरून आलो, असं सांगतात आणि ८ महिन्यात निवडणुकीमध्ये वेगळं भाषण करतात. भाषणात सातत्य असलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही अशी टीकाही केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पुरंदरमधील लोकांनी नेहमी साथ देतात. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या का? लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते. ४०० पार करण्याचा अर्थ असा आहे त्यांना वाटेल ते त्यांना करायच आहे. त्यांना संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना ४०० जागा पाहिजे आहेत. नरेंद्र मोदींची धोरण काय आहेत यातून कळते, त्यामुळे अधिक या निवडणुकीत लक्ष देण्याची गरज आहे असे ही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू. नुसती तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आपली खून आहे. देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आपली आहे. बांगलादेश सारखा देश आपल्यापेक्षा पुढे आहे. अशोक चव्हाण यंच्यावर आरोप केलं ते भाजपासोबत गेले. भोपाळमध्ये भाषण केले बँक आणि इरिगेशन मध्ये घोटाळा केला असा आरोप केला. ज्यांच्यावर आरोप केले ते आज कुठं आहेत? झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं असे टीकास्त्रही यावेळी सो़डले.

 

About Editor

Check Also

दादाजी भुसे यांची माहिती, शाळांच्या सुविधा उभारणीसाठी विविध स्रोतांतून निधीचा प्रभावी उपयोग सीएसआर फंड, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी निधी वापरणार

राज्यातील शाळांची भौतिक सुविधा सुधारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, तसेच मनरेगा अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *