शरद पवार यांचे आवाहन, कोणं गेलं याची चिंता करू नका, ५० टक्के महिलांना निवडूण आणा तुमच्या कष्टामुळे आज आपण २६वा वर्धापन दिन साजरा

दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात ५० टक्के महिलांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते.

शरद पवार बोलताना म्हणाले की, मुलींना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. अगदी सैन्य दलातही ते दिसून आले. ऑपरेशन सिंदूरबाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषद, मनपा निवडणुका आल्यात. येथे पन्नास टक्के महिलांना संधी मिळाली तर त्याही कर्तुत्व दाखवतात. महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय आपल्याला यशस्वी करायचा आहे. पक्षात फूट पडली. फूट पडेल असं वाटत नव्हतं, पण पडली. विचारात अंतर पडलं त्यामुळे फूट पडली. जे राहिले ते विचाराने राहिले. आता तेच विचार घेऊन जनतेला साथ देण्यासाठी राहिले. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल. चिंता करू नका. कोण गेलं याची चिंता करू नका. एकसंध रहा जनतेशी बांधिलकी कायम ठेवा काहीच अडचण येणार नाही. उद्याच्याा निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल. आता पुढील तीन महिने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करा असे आवाहन करत ५० महिलांना निवडून आणा असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या लोकांना जनतेने संधी दिली. अनेक पदे मिळाली. यातून लोकांची सेवा कSharad Pawar रण्याची संधी मिळाली. तुमच्यातील अनेक सहकारी कधी सत्तेत नव्हते. पण त्याना संधी मिळाली त्यातून एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रमाणिक कार्य़कर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तुत्व दाखवू शकतो. राज्य चालवू शकतो. तुमच्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले पण ते आज नाहीत. आर. आर पाटील. सामान्य कुटुंबातले होते. हा कोण मुलगा. मला सांगण्यात आलं त्यांचे नाव आर. आर. पाटील मी चर्चा केली. माझ्या लक्षात आलं त्यांच्यात कर्तुत्व आहे. नंतर त्यांना संधी मिळत गेली. निवडणुकीत सत्ता मिळाली. ग्रामविकास खाते नंतर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून काम केले. त्यांचे अनेक निर्णय जनतेला भावले. यातून राष्ट्रवादी सामान्यांना संधी देते असा संदेश गेला. यातून तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, बांधिलकीतून पक्षाची प्रतिष्ठा वाढल्याचेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, १९८० मध्ये सत्ता गेली निवडणुका आल्या ५० ते ५२ निवडून आले. पण नंतर फक्त ६ शिल्लक राहिले. त्यातील आजही एक येथे आहेत. आमचा पक्ष सहा जणांचा झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली. त्यामुळे चिंता करू नका. कोण गेलं याची चिंता करू नका. एकसंध रहा जनतेशी बांधिलकी कायम ठेवा काहीच अडचण येणार नाही. एका लहानशा घरात. एका खोलीत राहणारा, रात्री दोन वाजेपर्यंत लोकांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून निलेश लंके त्यांच्याकडे पाहिलं जातं. हाच राष्ट्रवादीचा ठेवा. याचा विचार करा. सत्ता आपोआप येईल. ती येण्याची शक्यता आता मला दिसते आहे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, देशाच्या आजूबाजूचं वातावरण चिंताजनक राष्ट्राच्या हिताच्या आड राष्ट्रवादी कधीच येत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही. सरकारच्या भूमिकेचं समर्थन करू असे तेव्हाच सांगितले होते. देशाचं चित्र पाहिलं तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन, शेजारी पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आहे. आजूबाजूचे देश आणि आपण यात काय स्थिती आहे. कुणाशीच संबंध चांगले राहिलेले नाहीत. नेहरूंच्या काळात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा भारत होता. बांग्लादेशही भारताचा मित्र राहिलेला नाही. श्रीलंकेवरील चीनचा प्रभाव चिंताजनक आहे. याचा अर्थ देशाच्या नेतृत्वाने सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक केली नाही. आम्ही यात राजकारण आणणार नाही. पण आता देशाच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्या असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *