नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मारकडवाडीतील ग्रामस्थाना उत्तम जानकर यांच्या बाजूने मतदान केले असताना मात्र भाजपाच्या उमेदवाराला एक हजार मतांचा लीड मिळाला. त्यामुळे ईव्हीएमच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित करत मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. मात्र मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिस आणि स्थानिक प्रशासने गुन्हे दाखल केले. तसेच मिळालेल्या मतांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही निवडणूकीत मिळालेल्या मतांचे आकडेवारी आणि मिळालेल्या जागांवर भाष्य करत ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काल जाहिर केल्याप्रमाणे शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेत त्यांची बाजू ऐकून घेतली.
यावेळी मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोर बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत मिळालेली मते आणि प्रत्यक्षात विजयी मिळविलेल्या जागा यात मोठ्या प्रमाणावर फरक आहे. आज जगात कुठेही ईव्हीएम मशिन्सवर मतदान होत नाही. परंतु भारतातच याचा वापर भारतातच का होतोय असा सवाल उपस्थित करत आज तुमच्या गावाने वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले असेल तर सरकारने तुमच्या विरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या, याबाबतची तक्रार आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाकडे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे करू असे सांगत हे सगळं कशासाठी तर निवडणूक यंत्रणांचा काळ सोकावू नये म्हणून असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात निवडणूकीचा विजय मिळविल्यानंतर कोठेही उत्साहाचे की आनंदाचे वातावरण नाही. आता जर निवडणूक आयोगा घेतलेल्या ईव्ही पद्धतीवर संशय निर्माण झाला असेल तर निवडणूक पद्धतीतत बदल करण्याची गरज असल्याचे सांगत गावागावात आणि शहरामध्ये ईव्हीएम मशिन्स ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे असे ठराव आणि निर्य घ्यावेत घ्यावेत असे आवाहनही यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी निवडणूकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला की, पवार यांनी हे करणं योग्य नाही. मी काय चुकीचं केलं असा सवाल करत तुमच्या गावी येतो, त्याबद्दल जाणून घेतो हे चुकीचे आहे का असा सवाल करत लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेते. त्याचे निरसन चुकीचे त्याचे निरसन करणे चुकीचे आहे का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावेळी त्यांना लोकांचे म्हणणे जाणून घ्यावे असे आव्हानही यावेळी केले.
यावेळी निवडणूकीत विजयी झालेले आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, मी राजीनामा द्यायला तयार असून जर निवडणूक आयोगाने मतदान बॅलेट पेपरवर घेणार असेल तर पुन्हा एकदा राजीनामा देऊन निवडणूकीला सामोर जाण्यास तयार असल्याचेही आव्हान निवडणूक आयोगाला दिले.
Marathi e-Batmya