आदित्य ठाकरे निघाले बिहार दौऱ्यावर

शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचा दौरा केलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आता एकदिवसीय बिहारच्या दौऱ्यावर उद्या बुधवारी जात आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेणार असल्याची माहिती उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिली.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी काही प्रमुख पदाधिकारी बिहार दौऱ्यावर जाणार असल्याचे येत आहे.

काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड आणि भाजपाची सत्ता होती. मात्र जनता दलातील आमदारांवर भाजपाने शिंदे फॉर्म्युल्याचा वापर केल्याचे वेळीच उघडकीस आले. त्यामुळे भाजपाचा जनता दल युनायटेड फोडण्याचा प्रयत्न फसला. नेमक्या याच कालावधीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या मदतीने पुन्हा राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना देण्यात आले.

राष्ट्रीय जनता दल हा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र बिहार विधानसभा निवडणूकीच्या वेळी लालू प्रसाद यादव हे तुरुंगात असताना तेजस्वी यादव यांनी चांगलीच लढत देत राष्ट्रीय जनता दलाचे आमदार चांगल्या संख्येने निवडूण आणले. त्यामुळे लालू प्रसाद यांची बिहारच्या राजकारणातील जागा तेजस्वी यादव यांनी भरून काढल्याचे बोलले जात आहे.

मात्र आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी सध्या बिगर भाजपा पक्षांकडून एकत्र येण्याच्या हालचाली सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *