मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत होती. मात्र शिवसेनेकडून कोणतीच यादी जाहीर होत नसल्याने शिवसेनेचे उमेदवार जाहीर तरी होणार कधी असा सवाल उपस्थित होत होता. अखेर आज शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत २१ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात १७ विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली.
या यादीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते पद्मसिंह पाटील यांचे कट्टर विरोधक ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. या व्यतीरिक्त सातार आणि पालघर येथील उमेदवार जाहीर करण्याचे राहिले आहे. यापैकी सातारा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान खासदार उदयनराजे भोसेले यांच्या विरोधात शिवसेनेकडून सध्या भाजपच्या आश्रयास असलेले नरेंद्र पाटील यांना देण्यात येणार असल्याचे घाटत आहे.
शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
शिवसेनेची पहिली यादी-
लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी
1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई- गजानन किर्तीकर
4) ठाणे- राजन विचारे
5) कल्याण- श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर- संजय मंडलिक
7) हातकणंगले- धैर्यशील माने
8) नाशिक- हेमंत गोडसे
9) शिर्डी- सदाशिव लोखंडे
10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
11) संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
12) बुलढाणा- प्रतापराव जाधव
13) रामटेक- कृपाल तुमाणे
14) अमरावती- आनंदराव अडसूळ
15) परभणी- संजय जाधव
16) मावळ- श्रीरंग बारणे
17) धाराशिव (उस्मानाबाद)- ओमराजे निंबाळकर
18) हिंगोली – हेमंत पाटील
19) यवतमाळ – भावना गवळी
20) रायगढ़ – अनंत गीते
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
Marathi e-Batmya