उध्दव ठाकरे म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपाची चाल

शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुखांशी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज संवाद साधत शिवसेनेने केलेली कामे लोकांपर्यत न्या असे आवाहन करत येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असल्याचे सांगत मी तुमच्याबरोबर फिरण्यासाठीच धोके पत्करून माझ्यावरील शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले.  शिवसेनापक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान टप्पा २ च्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र येथील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन करताना ते यावेळी बोलत होते. काल प्रवक्त्यांची बैठक झाली आहे. मी अगदी थोडक्यात बोलणार असल्याचे सांगत अनेक दिवसांनी शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे. इतर पक्ष मुहूर्ताची वाट न बघता संपर्क करताहेत असे सांगत येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याचे सांगत कोल्हापूरातील पोटनिवडणूकीत तेथील जनतेने दाखवून दिले. तेथे आपण महाआघाडी म्हणून लढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पश्चिम बंगाल, केरळ सारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे.  बंगालच मोठं कर्तृत्व असून ममता दिदींनी गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची असल्याचे सांगत हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपाची चाल असल्याचा आरोपही त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? असा सवाल करत मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यावेळेला जनसंघाने फोडली यांना मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळ स्वतः करता हवय अशी टीका करत बाळासाहेब नेहमी म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे असा उपरोधिक टोलाही त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला.

गट प्रमुख, शाखाप्रमुख हे सगळे पदाधिकारी याद्या मला पाहिजे. जन्मापासून शिवसेनेकडे नविन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या मग बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, अस करत शिवसेना वाढवायची असे सांगत शिवसैनिक अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही असा टोला लगावत लोकांना फक्त भेटून धीर द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्याला समजू द्या. गावाची जनतेची कामे सुध्दा त्या गावाची जरुर घेवून या आणि करून घ्या असेही त्यांनी सांगितले. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मी फिरणार असून शस्त्रक्रिया ही धोके पत्करून केली ते तुमच्या सोबत फिरण्यासाठी. आता दौरे करणार दुसरा टप्पा आता सुरु होईल असे सांगत सर्व जिल्हा प्रमुख आणि शाखाप्रमुखांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *