शिवसेना उबाठा गटाने जाहिर केली १६ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीयस्तरावरील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात काँग्रेस पक्षाने आणि भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने मात्र प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रादेशिक पक्षांनाचा प्राधान्यक्रम देत स्वतःच्या हिशाच्या जागा जाहिर केल्या. याच कृत्याची पुनरावृत्ती भाजपाने करत त्यांच्या पक्षाच्या हिश्याला येणाऱ्या जागांचे वाटप जाहिर केले. मात्र या दोन्ही काँग्रेस आणि भाजपाने स्थानिक पक्षांच्या राजकिय हिस्सेदारीच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील अनेक जागा जाहिर करण्याचे बाकि ठेवले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाने आज त्यांच्या हिश्शाला येणाऱ्या १६ उमेदवारांची यादी जाहिर केली.

विशेष म्हणजे यातील काही जागांवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि यांच्याबरोबरील काही जागांवर वाद निर्माण झाला होता. मात्र या जागांवरून निर्माण झालेल्या वादाकडे साफ दुर्लक्ष करत शिवसेना उबाठा गटाने आपल्या १६ उमेदवारांची यादी जाहिर केली.

यात मुंबईतील दक्षिण, ईशान्य आणि वायव्य मुंबईतील जागांवर आपले उमेदवार जाहिर केले आहेत. याशिवाय सांगली च्या लोकसभा मतदारसंघावर चंद्रहार पाटील यांनाची उमेदवारी जाहिर केली. याशिवाय संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहिर केली. शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे यांना तर रायगडमधून अनंत गीते या प्रमुख जागांवर लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिर करण्यात आली.

शिवसेना उबाठा गटाने जारी केलेली १६ लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर-

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *