मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या निकालाने राज्यातील सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घेण्याशिवाय भाजपाला पर्याय राहीला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने ठाकरे घराण्याचा वारस असलेल्या आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात कोणीही सत्तेवर आले तरी राजकिय पक्षांकडून करण्यात येत असलेल्या एकांगी कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम राज्यातील जनता करते. तसेच ती आपला तिसरा डोळा उघडून त्यास लगामही लावते. निकालाच्या माध्यमातून जनतेने हे काम केल्याचे सांगत भाजपाच्या २२० पारच्या घोषणेला लगाम लावल्याचा टोलाही त्यांनी लागवला.
याशिवाय अंतिम निकालानंतर फॉर्म्युल्यावर निर्णय झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करणार असून सत्तेसाठी कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya