राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून तसेच मतदार यादीतील दुबारे नावे आणि बोगस मतदान रोखण्यासाठी आधार कार्डशी, पॅन कार्ड, रेशन कार्ड यांच्याशी जोडले जाते. तसे मतदार कार्ड आधार कार्डशी का जोडले जात नाही असा असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने करत प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रे वाढविण्याची मागणी शिवसेना उबाठाचे नेते सुभाष देसाई यांनी एका पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली.
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाने आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, बोगस मतदान आणि दुबार मतदारांकडून करण्यात येणारे बेकायदेशीर मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने दुबार नावे असलेल्या मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्या मतदाराचे दुसऱ्या मतदान केंद्रावर असलेल्या नाव असलेल्या ठिकाणी लगेच तात्काळ संदेश पोहोचावा जेणेकरून त्या मतदाराकडून दुसऱ्या मतदान केंद्रावर होणारे दुबार मतदान रोखले जावे अशी मागणीही यावेळी केली.
याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदारांना रांगेतील मतदारांना बसण्याची सुविधा, वृद्ध, अपंग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी आवश्यक असणाऱ्या पुरेशा सुविधा, पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रात जाण्यासाठी पायऱ्या चढून जाण्याऐवजी रॅम्प लिफ्टची सुविधा, पिण्याचे पाणी-टॉयलेटची सुविधा, मतदान कसे व कोणत्या पद्धतीने करावे याच्या सूचना ठळक मोठ्या अक्षरात लिहिलेल्या असाव्यात, मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असेल तर मोबाईल सुरक्षित ठेवण्याची सुविधा करावी, प्रत्येक कामासाठी वेगवेगळे निवडणूक अधिकारी नेमावे, प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे काम शिपाई-पोलिस यांना न देता मतदार रागांचे नियमन करावे, मतदारांना सोयी देण्याचे कामे त्यांना द्यावीत यासाठी मतदान अधिकारी वाढवावेत अशी सूचनाही यावेळी शिवसेना उबाठा पक्षाने पाठविलेल्या पत्रात करण्यात आले आहे.
त्याचबरोबर मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या अनुषंगानेही काही सूचना करण्यात आल्या असून मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक केंद्र कर्मचारी यांना भोजन देण्यात यावे, भोजनाचा दर्जा चांगला असावा, महिलांना रात्रभर केंद्रावर थांबावे लागते, त्यानंतर त्यांच्या सुरक्षेची तसेच वाहतुकीची कोणतीही व्यवस्था करण्यात येत नाही, प्रिसायडींग ऑफिसर आणि पोलिंग एजंट दोन्ही पुरुष असावेत, जदततगलु ऑफिसर स्त्रीया असाव्यात, निवडणूक साहित्य परत करण्याची जबाबदारी उभय पुरुषांकडे सोपवून महिला साहित्य जमा केल्यानंतर कार्यमुक्त करावे, महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षित निवास व्यवस्था, इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, निवडणूकीच्या दिवशी धिम्या लोकल सेवेची विशेषतः सकाळी ३.३० नंतर वारंवारता वाढवावी अशी सूचनाही पत्राद्वारे शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने करण्यात आली.
शिवसेना उबाठाने निवडणूक आयोगाला दिलेले हेच ते पत्रः

Marathi e-Batmya