Breaking News

सुनिल तटकरे यांचा आरोप, एक नॅरेटीव्ह सेट करायचा प्रयत्न सुरु सहाभूतीची लाट असेल असू शकेल

अजित पवार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यात आम्हाला अपयश आलं मी कबुल करतो, निवडणूकांच्या काळात जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसतशी सहानभूतीचं वातावरण निर्माण केलं जातं. ते सहानभूतीला उत्तर देण्यात कमी पडलो अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.

पुढे बोलताना सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक निवडणूकीची समीकरणं वेगवेगळी असतात, आम्ही इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील निवडणूक काळातील वातावरणं पाहिली आहेत. प्रत्येक निवडणूकीत वेगवेगळं वातावरण असतं. मात्र यावेळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जे काही वातावरण निर्माण करण्यात करण्यात आलं त्याकडे आमचं दुर्लक्ष झाल्याचंही यावेळी सांगितले.

त्याचबरोबर सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, पुढील आठवड्यापासून पक्षसंघटना बांधणीसाठी म्हणून प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी राज्यव्यापी दौरा सुरु करणार आहे. तसेच महिला आघाडी मजबूत करण्यासाठीही महिला प्रदेशाध्यक्षाही राज्यव्यापी दौरा करणार आहेत. तसेच राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आल्यानंतर लगेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे ही राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं सांगितले.

याशिवाय पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, मी त्या गटाच्या नेत्यांची भाषणं ऐकली. सत्य कधी ना कधी बाहेर येते म्हणतात ते खरं आहे. त्यात डॉ जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या समोर सांगितलं की, जे आम्ही मागील वर्षभरापासून सांगत आलो आहोत की त्याच गोष्टी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणातून सांगितल्या. मोठ्या साहेबांनी अजित पवार यांना चार वेळा वेडं बनविलं बरं हे मी बोलत नसून हे जितेंद्र आव्हाड यांचे शब्द होते. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेल्या गोष्टी ह्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही जे सांगत होतो हे या निमित्ताने आज खरं झालं. त्याबद्दल डॉक्टरांना खास धन्यवाद असा उल्लेखही यावेळी केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *