Breaking News

सुनिल तटकरे यांची माहिती,अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधूनच जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा

राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सन्मान यात्रा नाशिकमध्ये आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, महिला रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार जयवंतराव जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षापासून अजित पवार राजकारणात प्रभावीपणे काम करत आहे. त्यांना बदनाम करण्याचे काम करण्यात आहे. विरोधकांकडून आपल्याला नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, विविध योजनांची घोषणा करून महाविकास आघाडीला जमिनीवर आणण्याचे काम अजित पवार यांनी केलं आहे. राज्यात विविध घोषणा करत असताना आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक यश कसं मिळेल यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अजित पवार सर्व ज्येष्ठ नेत्यांसमावेत जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपण येणाऱ्या निवडणुकीत मोठ यश मिळवू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, महायुती सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व काम करतील असे सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *