यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ‘लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करत महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार आहे असा विश्वास व्यक्त केला. यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते, आपल्याही आयुष्यात आलं, म्हणून हतबल व्हायची गरज नाही तसेच स्वतःवर विश्वास ठेवला तर एक दिवस आपण नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी विदेशात देशाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली. ज्या, ज्या देशांत मी गेले त्या ठिकाणी एकच प्रश्न विचारला जात होता, तुमचा देश महात्मा गांधींचा देश आहे. आम्हाला आजही तुमच्या देशातील पंडित नेहरु यांचे भाषण आठवते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्याबद्दल सर्वच बोलत होते. गैरसमज नसावा मोदी यांच्याबद्दलही चांगले बोलले गेल्याचे यावेळी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, मंत्र्यापेक्षा आमच्या खासदारांचे भाषण लोकसभेत भारी असतात. देशात मोठा निर्णय घेतला जातो तेव्हा राष्ट्रवादीचं मत घेतलं जातं. तर राजकारणात काम करताना पॉलिसी लेव्हलला काम केलं पाहिजे. राजा जर विमानाने चालत असेल, तर त्याला प्रजाचं काय चाललंय ते कसं समजणार? उपरोधिक सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्षांतर्गत बैठका, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करताना म्हणाल्या की, पुढच्या महिन्यापासून स्वतः राज्याचा दौरा करणार आहे. आज राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज पासून पूर्ण ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सामाजिक प्रश्नासाठी पेटून उठेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
📍बालगंधर्व रंगमंदिर, पुणे ⏭️ 10-06-2025 ➡️ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – वर्धापन दिन सोहळ्यातून लाईव्ह https://t.co/ksKGehNOsY
— Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2025
Marathi e-Batmya