पोषक आहार धान्य खरेदीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खडसेंची मागणी

नागपूर: प्रतिनिधी

राज्यातील शाळांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषक आहाराच्या धान्य खरेदीत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

विधानसभेत रायगड जिल्ह्यात शालेय पोषण आहार पुरविण्याच्या कामात अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात आल्याचा आरोप चंद्रपूरचे कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अगरवाल यांनी केला. यावेळी उपस्थित केलेल्या मुद्यावर खडसे यांनी उपप्रश्न विचारत राज्य सरकारला चांगलेच अडचणीत आणले.

खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षम मंत्री विनोद तावडे म्हणाले की, अनेकवेळा पोषण आहारासाठी खरेदी करण्यात येत असलेले धान्याचे दर आणि निर्धारीत करण्यात येत असलेले दर यात फारतर १० टक्क्यांचा फरक असतो. त्यात वाहतूकीच्या खर्चाचाही समावेश असतो. तसेच हे दर वर्षभरासाठीचे असल्याने निर्धारीत केलेले दर जास्त महाग नसल्याचा दावा केला.

त्यावर खडसे यांनी हरकत घेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्रत्येक धान्याचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दर आणि निर्धारीत केलेले दर यात जमीन अस्मानचे अंतर आहे. यासंदर्भात जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारला वेळोवेळी कळविले आहे. तरीही राज्य सरकारकडून काहीही कारवाई केली जात नसल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आणून देत याप्रकरणी सर्व कागदपत्रे पुरविण्याची तयारी दर्शविली.

अखेर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पोषण आहार धान्य खरेदीच्या दराची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *