संजय राऊत यांची खोचक टीका, कांद्याला फेकून द्यायचय, तर ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही गुलाबरावला रस्त्यावर फेकून द्यायचाय

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडले. राऊत यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे मालेगावचे आमदार दादा भुसे यांचा उल्लेख ढेकूण असा केला. तर सुहास कांदे यांना बाजारातील कांद्याची उपमा दिली.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, आज सकाळपासून उद्धव ठाकरे यांची तोफ मालेगावात धडाडणार, अशा बातम्या टीव्हीवर चालवल्या जात आहेत. पण मालेगावचं ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. दरम्यान, त्यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, या महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे असंख्य प्रश्न आहेत. कांद्याला भाव मिळत नाहीये. कांदा रस्त्यावर फेकला जातोय. पण आता आपल्याला सुहास कांदेला बाजुच्या रस्त्यावर फेकायचं आहे आणि कांद्याला भाव द्यायचा आहे. आपल्याला तिकडे गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचं आहे. ज्यांनी-ज्यांनी उद्धव ठाकरेंशी आणि शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली, त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे अशी खोचक टीकाही केली.

About Editor

Check Also

फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा

अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *