पहिल्याच दिवशी फडणवीसांचा आरोप भास्कर जाधव धमकावतायत… फडणवीसांच्या आरोपावर भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर आमचा आवाजच तसा आहे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आज राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली.  राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर अभिभाषण केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मांडला त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं. मात्र ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पाँईट ऑफ इर्म्पोरमेशन अंतर्गत काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यात खडाखडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या कामकाजाचा अजेंडा रात्री १२ ला मिळतो. तसेच आमदारांना त्यांच्या प्रश्नांची कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांच्या या मुद्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. परंतु तत्पूर्वीच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पाँईट ऑफ इन्फॉर्मेशन खाली काही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा माईक चालूच झाला नसल्याने अखेर त्यांनी मोठ्या आवाजात आपला मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव हे अध्यक्षांना धमकावित असल्याचा आरोप करत समज देण्याची मागणी केली. त्यावर सत्ताधारी बाकावरील सदस्य आक्रमक होत मोकळ्या जागेकडे जमा होण्यास सुरुवात केली.

त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत केले.

फडणवीस यांच्या या आरोपानंतर भास्कर जाधव म्हणाले, माझा आवाजच मोठा असल्याचे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव समज दिली.

दरम्यान, आमदारांना सभागृहातील कामकाजाची कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत जाधव अध्यक्षांना उद्देशून असे धमकावणे योग्य नाही म्हटले यावर सत्तारूढ सदस्य आक्रमक झाले. अध्यक्षांनी सगळ्यांना शांत करीत जाधव यांना सभागृहाची परंपरा राखावी अशी समज दिली.

यावर भास्कर जाधव यांनी सहमती दर्शवली आणि आपल्याला मुद्दा उपस्थित करायचा होता, आपला आवाज मोठा आहे, मात्र अध्यक्षांनी ही आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यपालांच्या आभाराचा प्रस्ताव सत्तारूढ बाजूने मांडला जावा आणि त्याला त्यांच्या सहयोगी पक्षाने अनुमोदन द्यावे अशी आपली प्रथा असल्याचं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात यानंतर पुरवणी मागण्या सादर केल्या.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *