ग्रामपंचायत आणि सरपंच पदाच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज

राज्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. तसेच या निवडणूकांसोबत सरपंच पदासाठीही निव़डणूका घेण्यात येणार आहेत. मात्र सुरुवातीला या निवडणूकांसाठी ऑनलाईन अर्ज अर्थात नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र आज ऑनलाईन अर्जाऐवजी ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून तशा सूचना ग्रामपंचायत निवडणूक अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी २ डिसेंबर पर्यत ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे संभावित उमेदवारांना आता उद्या नियोजित वेळेत सरपंच पदासाठी आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहे.

यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस.मदान म्हणाले की, विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील असेही त्यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेले आदेश खालीलप्रमाणे

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *