आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाः रिदा रशीद यांनी व्हिडिओ केले व्हायरल

ठाणे-कळवा दरम्यान असलेल्या तिसऱ्या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काल पार पडले. त्यानंतर रात्री कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची निघताना एकच गर्दी झाली. या गर्दीत जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचे व्हिडीओही सदर महिलेने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून प्रसारीत केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा आणि आलेल्या नागरिकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे चालत निघालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यात येणाऱ्या अनेकांना बाजूला करत पुढे निघाले. दरम्यान ते जात असलेल्या मार्गावरच एक महिला आडवी आल्याने आव्हाड यांनी त्या महिलेला बाजूला करत पुढे गेले. त्यामुळे सदर महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर महिलेचे नाव रिदा रशीद असून त्या भाजपाच्या महिला कार्यकर्त्या असल्याचे समजते.

या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांनी आपल्याला हात लावून बाजूला केल्याचा आरोप करतानाच त्यांनी आपल्याला पाहताच एक वाक्य म्हटल्याचंही रशीदा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रशिदा यांनी ट्वीट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केले, तू इथं काय करतेस असं माझा हात पकडून म्हटलं, असा आरोप रिदा रशीद यांनी केला आहे. मी एक महिला असून अशाप्रकारे महिलेचा सर्वासमोर अपमान करण्यात आला. पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी रशीद यांनी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, चित्रा वाघ, भाजपा महिला मोर्चाच्या खात्यांना टॅग करुन केली.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही ३५४ मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार असून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं ट्वीट आव्हाड यांनी केले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *