Breaking News

लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, तर चंद्रकांत पाटील थेट दालनात विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूकीपाठोपाठ राज्य विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा दारून पराभव झाला. त्यामुळे भाजपाकडून सातत्याने जूना जोडीदार म्हणून उद्धव ठाकरे यांना सातत्याने चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. त्यात आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात एकाच लिफ्टने तळमजल्यावरून ४ थ्या मजल्यावर पोहोचले. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात पोहोचले. त्यामुळे विधिमंडळात पहिल्यांच दिवशी उद्धव ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या झालेल्या या भेटीमुळे राज्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले.

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे ते विधान भवन परिसरात पोहोचत चवथ्या मजल्यावरील विधान परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी लिफ्टजवळ पोहोचले. तर नेमक्या त्याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही पोहोचले. तेव्हा आधीच लिफ्टमध्ये चढलेल्या नागरिकांना पुन्हा लिफ्ट रिकामी करण्यास सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे लिफ्टमध्ये चढले आणि दोघेही लिफ्टने चवथ्या मजल्यावर पोहोचले.

चवथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे लिफ्टमधून बाहेर पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या विरूध्द बाजूने निघून गेले. मात्र लिफ्टमध्ये या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता लागून राहिली. परंतु नेमक्या या वेळी उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या सु भेटीचा कार्यक्रम मोबाईलवर शुट करण्यावाजून पर्याय राहिला नाही. मात्र लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी भेटण्याचे टाळले.

(ट्विट सौजन्य- पत्रकार अभिनय देशपांडे)

तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात पोहोचले होते. त्यावेळी भाजपा नेते तथा राज्याचे मंत्री चंद्राकांत पाटील हे ही उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे यांच्या दालनात पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दालनात उपस्थित असलेले अनिल परब यांना शुभेच्छा देत मिठाईही यावेळी दिली. मात्र लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांनी दिलेली मिठाईही खाल्ली.

 

यावेळी चंद्रकांत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी गप्पा मारायला बसा असेच येत रहा आणि प्रेम असेच राहु द्या अशी सूचनाही केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाच्या या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का मंत्री अनिल पाटील यांच्या उत्तरावर विजय वडेट्टीवार सह विरोधकांचा आक्षेप

राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *