उद्धव ठाकरे यांचे उत्तर, ३० वर्षे भाजपासोबत राहून शिवसेना विसर्जित केली नाही.. तर शिवसेना उबाठा पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिंदे शिवसेनेला दिले प्रतित्तुर

शिवसेना पक्षाला ६० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित वर्धापन दिना निमित्त मांटुगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे शिवसेनेकडून शिवसेना उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या भाजपाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते. त्या भाजपाबरोबर ३० वर्षे युती होती. त्यावेळी शिवसेना भाजपामध्ये विसर्जित केली नाही. मग आता काही वर्षे काँग्रेस सोबत राहिलो म्हणून सेना काँग्रेसमध्ये विसर्जित केली जाणार असल्याचे म्हणणे योग्य नसल्याचे प्रतित्तुर विरोधकांना दिले.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता जे कोणी आपल्याला सोडून गद्दारांच्या कळपात गेले, त्यांच्या विजयासाठीही शिवसेना उबाठाचा पक्षप्रमुख म्हणून मी किमान ६ ते १० वेळा लोकसभा निवडणूकीत प्रचारसभा घेतल्याची माहिती दिली. आणि हेच माझ्यावर आरोप करत आहेत की, मी भेटीसाठी वेळ देत नाही म्हणून, मग त्यांच्या प्रचारासाठी कोण जाहिर सभा घेत होते असा सवालही यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या दाव्यातील हवा काढताना म्हणाले की, भाजपाच्या नरेंद्र मोदी यांची हवा असताना, पक्ष फोडलेला असतानाही शिवसेना उबाठाचे 9 खासदार निवडून आले. हे खासदार केवळ निवडूण आले ते केवळ शिवसैनिकांमुळे शिवसेनेमुळे. भाजपाकडून दुसऱ्यांची मुलं पळवली जात आहेत. त्यानुसार आमचा पक्ष म्हणजे तुम्हाला मुल पुरवणारी संघटना नाही अशी टीका करत भाजपाला हे भारी पडणार असल्याचा इशाराही यावेळी दिली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा अशी दुसऱ्याची पोरं पळवून काय करणार आहे असा सवाल करत ही स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही असे सांगत देशात दहशतवादी घुसत असताना भाजपावाल्यांनी फक्त पश्चिम बंगाल मध्ये एक महिला ममता बँनर्जींच्या पराभवासाठी सैन्य दल घुसवत आपली मर्दुमुकी दाखविण्याचा प्रयत्न केला. पण मणिपूर मागील अनेक महिन्यापासून जळत असताना मात्र तेथे सैन्य घुसविण्याचे धाडस केले नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाचे देशातील सर्व राजकिय पक्ष फोडण्याचे काम करत असून कोणत्या पध्दतीचे हिंदुत्व देशात राबविणार आहे. शिवसेना उबाठाचे हिंदूत्व हे घंडा बडविणाऱ्यांचे नसून ते देशासाठीचे असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही गद्दार होते, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातही गद्दार होते. या गद्दारांमुळे या सर्व महापुरुषांना त्रास झाला. पण तरीही या महापुरुषांनी कधी माघार घेतली नाही. त्यामुळे जे गद्दार शिवसेनेतून गेले त्यामुळे शिवसेना पक्ष काही फुटणार नाही की, संपणार नाही असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला काही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आयुष्यभर राहायचे नाही की, ते पद मी माझ्यासाठी घेतले नाही. पण या शिवसेनेतील कोणत्याही शेवटचा शिवसैनिकाने हे पद स्विकारतो म्हणून पुढे आला तर मी हे पद कधीही सोडायला तयार आहे. पण कोणत्याही गद्दार, कदरू आणि फितुराच्या हाती शिवसेना हाती द्यायची नाही असेही यावेळी सांगत उपस्थित शिवसैनिकांना साद घातली. त्यावर उपस्थित शिवसैनिकांनी नाही नाही म्हणून एकच धोषा लावला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण आवरते घेतले.

About Editor

Check Also

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *