केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर, वेळेवर निर्णय घेत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर पहिल्यांदाच गडकरींकडून भाष्य

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे जसे कामाच्या बाबत गतीमान आहेत, तसेच ते बोलण्याच्या बाबतही स्पष्ट असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कधी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून जिवंत राहीला पाहिजे, काँग्रेस सोडू नका, तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून नागरिकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा असे जाहिर सल्ले दिले होते. तर दुसऱ्याबाजूला भाजपामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस कोणी करत नाही. तसेच मोदी कसे गतीमान कारभार करतात, १८ तास काम करत असल्याची स्तुतीसुमने उधळण्यात भाजपाचे अनेक नेते धन्यता मानतात. पंरतु मागील काही दिवसांपासून नितीन गडकरी यांचे पध्दतीशीर पंख कापण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याकडून आणि त्यांच्या अधिपत्याखालील भाजपाकडून करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी काय बोलणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती.

यावेळी नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या कारभारावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर देत म्हणाले, वेळ ही अत्यंत महत्वाची असून विकास कामाबाबत सरकार वेळेवर निर्णय घेत नाही हीच मोठी समस्या असल्याचे मोठे वक्तव्य केले.

त्यामुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील संबध ताणले गेल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स ( NATCON 2022 ) च्यावतीने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील घरचा आहेर दिला.

बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असे ते म्हणाले.

भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल. कोणत्याही प्रकल्पासाठी त्याची गुणवत्ता, त्याची किंमत आणि त्याला लागणारा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *