मुंबई: प्रतिनिधी
स्वत:च्या वयोवृध्द आई-वडीलांच्या सेवेसाठी आता पर्यत महिला कर्मचाऱ्यांना बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता पतीच्या आई-वडीलांसाठी अर्थात सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार असून त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सासू-सासऱ्यांच्या सेवाशुश्रुषेसाठी बदली करून मिळण्याची अथवा महसुली विभाग बदलून मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे अनेक महिलांना इच्छा असूनही महिलांना सासू-सासऱ्यांची सेवा करता येत नव्हती. नेमकी ही बाब हेरून या नियमावलीतच बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार महसूली विभाग वाटप नियम – २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही करण्यात आला.
राज्य शासनातील गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम – २०१५ तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांना स्वत: किंवा आपला जोडीदार, मुले अथवा अवलंबून असलेले आई-वडील यांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तव महसूल विभाग बदलण्यासाठी विनंती अर्ज करण्याची मुभा होती. यामध्ये सुधारणा करून आता महिला अधिकाऱ्यांनाही आपल्या सासू-सासऱ्याच्या सुश्रुषेसाठीही महसुली विभाग बदलून मिळण्याची विनंती करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Marathi e-Batmya
please provide a copy of Maharashtra Revenue Department distribution rule -2015