संभाजी भिडेंचे अजब तर्कट, महिला पत्रकाराला म्हणाले आधी टिकली लावा …

आपल्या आचरट वक्तव्याने नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे आणि आपल्या मानसिकतेची कुवत दाखविणारे संभाजी भिडे यांनी आज थेट महिला पत्रकारास टिकली लावली तरच बोलेन असे वक्तव्य करत महिला पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करत पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला.

संभाजी भिडे हे आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यानंतर साम टीव्हीच्या महिला पत्रकार रूपाली बिडवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणती चर्चा झाली अशी विचारणा केली.

त्यावेळी संभाजी भिडे म्हणाले, टिकली लावलेली असेल तरच बोलेन असे सांगत बोलण्यास नकार दिला. तसेच आमच्या मताप्रमाणे प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रूप आहे. तसेच भारत माता ही विधवा नव्हती. तुमच्या कपाळावर टिकली नाही. त्यामुळे आधी टिकली लावा मग बोलतो असे अजब विधान करत अधिक बोलण्यास नकार दिला.

वास्तविक पाहता आपण २१ व्या शतकात रहात असताना आणि भारतीय राज्यघटनेने आणि सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात स्त्री असेल पुरूष असेल त्याने काय घालावे किंवा परिधान करावे हे व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे मान्य केले आहे. तसेच महिलांनी काय नेसावे किंवा काय परिधान करू नय़े या अनुषंगाने महिलांचे व्यक्ती स्वातंत्र्य मान्य समाजाने मान्य केलेले आहे. असे असताना टिकली लावली तरच मी बोलेन असे वक्तव्य करत अप्रत्यक्षरित्या महिला पत्रकाराच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण केले.

संभाजी भिडे यांच्या या अजब तर्कटाने राजकिय पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

About Editor

Check Also

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *