मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केटचे प्रशिक्षण सुरु करा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेअर मार्केट व्यवहारासंबंधी कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु करावा. तसेच कौशल्य विकासाअंतर्गत शेअर मार्केट संबंधी विविध कोर्सेस तयार करावेत असे निर्देश राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेअर मार्केट संबंधातील प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बडोले बोलत होते. या बैठकीस मुंबई शेअर मार्केटचे अध्यक्ष आशिष चौहाण, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, सह सचिव डींगळे आणि विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मागासवर्गीय तरुणांना पारंपरिक उद्योग व्यवसायाबरोबरच शेअर मार्केट संदर्भातील रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या तरुणांना म्युचअल फंड, शेअर ब्रोकर्स व शेअर मार्केट संबंधातील विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई शेअर मार्केटने विविध अभ्यासक्रम तयार करावेत, ग्रामीण मुलांना शेअर मार्केट संदर्भातील प्रशिक्षण घेता यावे यासाठी जिल्हा पातळीवर निवासी कोर्सेस तयार करावेत. असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त खास लेख

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *