Lalit Modi looks forward to India return

आयपीएलची संस्थापक ललित मोदी १६ वर्षांनी भारतात परतणार फेमा प्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर ललित मोदी यांचा निर्णय

आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २००९ च्या इंडियन प्रीमियर लीग दक्षिण आफ्रिका फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) प्रकरणात अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर १६ वर्षांनी भारतात परतण्याची योजना असल्याचे म्हटले आहे.

२०१० पासून भारताबाहेर राहत असलेल्या ललित मोदी यांनी सांगितले कीन्यायाधिकरणाच्या निकालाने १६ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईचा अंत झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात परतण्याची आशा आहे.

ललित मोदी पुढे म्हणाले की, कालच्या निकालाने मी खूप आनंदी आहे. हा खरोखरच एक उत्तम दिवस होता. सोळा वर्षे मी लढलो आणि मी माध्यमांना व सर्वांना जे काही सांगत होतोते अखेर सत्य म्हणून समोर आले आहे. न्यायाधिकरणाने माझ्या बाजूने निकाल दिला याचा मला खूप आनंद आहे. मला फक्त आयपीएलच्या हिताची काळजी होतीबाकी कशाचीही नाही. तेच माझ्यासाठी सर्वात प्रिय आहे. आता ते प्रकरण मागे पडले आहेमी माझ्या आयुष्यात पुढे जाणार आहे आणि भारतात परत येण्यास उत्सुक आहे.

या वर्षाच्या अखेरीस नातवाच्या जन्मानंतर परत येण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना ललित मोदी म्हणाले की, मी कदाचित या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला परत येईन. माझ्या मुलीला ऑक्टोबरमध्ये नातू होणार आहे आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल आणि मी भारतात परत येईन.

तस्कर आणि परकीय चलन हाताळणारे (मालमत्ता जप्ती) कायदा (SAFEMA) अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणानेदक्षिण आफ्रिकेतील २००९ च्या आयपीएल हंगामाशी संबंधित मुख्य खटल्यातील मोदी आणि इतर अपीलकर्त्यांविरुद्ध अंमलबारी संचालनालयाने दिलेले बहुतांश निष्कर्ष आणि दंड रद्द केले आहेत.

न्यायाधिकरणाने असा निकाल दिला कीमुख्य खटल्यातील कथित फेमा (FEMA) उल्लंघनांसाठी मोदी जबाबदार होते हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. हा निकाल १६ जुलै रोजी देण्यात आला.

हे प्रकरण २००९ सालचे आहेजेव्हा आयपीएल स्पर्धा सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात आल्यामुळे ती भारतातून दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली होती. परदेशात स्पर्धा आयोजित करण्यासाठी केलेल्या परकीय चलन हस्तांतरणाबाबत अंमलबारी संचालनालयाने कारवाई सुरू केली होती आणि त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचा आरोप केला होता.

या निकालाचे स्वागत करताना ललित मोदी म्हणाले कीन्यायाधिकरणाने त्यांच्याविरुद्ध अंमलबारी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्याचा पायाच फेटाळून लावला आहे.

न्यायाधिकरणाने माझ्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेला खटला ज्या मुख्य गृहितकावर आधारित होताते फेटाळून लावले आहे. दक्षिण आफ्रिकेत आयपीएल २००९ च्या आयोजनाशी संबंधित प्रमुख परकीय चलन हस्तांतरण हे भांडवली खात्यातील व्यवहार नसून चालू खात्यातील व्यवहार होतेअसे न्यायाधिकरणाने नमूद केले आहेआणि याद्वारे पूर्वीच्या निष्कर्षांचा पायाच उधळून लावला आहे.

हा निकाल मोदींसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा आहेजे आयपीएलचे शिल्पकार होते आणि त्याचे पहिले अध्यक्ष व आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. अंमलबजावणी संचालनालयभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयकर विभागाकडून अनेक चौकशांना सामोरे गेल्यानंतर ते २०१० मध्ये भारत सोडून गेले.

About Editor

Check Also

राहुल गांधी आणि पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात चर्चा, पण ठिय्या आंदोलन सोडण्यास नकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकिय निवासस्थानाबाहेर पोलिसांचे आगमन

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जनतेला होणाऱ्या गैरसोयीचे कारण देत आणि ते ठिकाण आंदोलनासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *