ममता बँनर्जी यांची घोषणा, पंतप्रधान मोदी यांच्या वक्फ कायद्याची अंमलबजावणी करणार नाही एक्सवरून दिला इशारा, दंगलग्रस्त भागातील पाहणीनंतर एक्सवरील ट्विटमधून दिली माहिती

नरेंद्र मोदी सरकारने राज्यात नव्याने लागू केलेल्या वक्फ कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर करून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शांततेचे आवाहन केले.

एक्स वर ट्विट करत मुख्यमंत्री ममता बँनर्जी म्हणाल्या की, “आम्ही या विषयावर आमची भूमिका स्पष्ट केली आहे – आम्ही या कायद्याचे समर्थन करत नाही. हा कायदा आमच्या राज्यात लागू केला जाणार नाही. मग दंगल कशासाठी आहे?”, असा सावलही यावेळी उपस्थित केला.

मुख्यमंत्री ममता बँनर्जी पुढे म्हणाल्या की, “सर्व धर्माच्या लोकांना माझे प्रामाणिक आवाहन आहे की, कृपया शांत राहा, संयम ठेवा. धर्माच्या नावाखाली कोणत्याही बेकायदेशीर वर्तनात सहभागी होऊ नका. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे. राजकारणासाठी दंगली भडकावू नका. जे दंगली भडकावत आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत,” असंही यावेळी जाहिर केले.

वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याने शुक्रवारी नमाजानंतर निदर्शकांमध्ये आणि पोलिसांशी झालेल्या संघर्षात किमान १५ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. बंगालचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राजीव कुमार यांच्या मते, अफवा पसरवण्यामुळे शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली, ज्यामध्ये अनेक सरकारी वाहने, पोलिस चौक्या, रेल्वे कार्यालये आणि दुकाने यासह इमारतींची तोडफोड आणि आग लावण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी निषेध करणाऱ्यांना आठवण करून दिली की त्यांच्या पक्षाने कायद्यात सुधारणा केलेली नाही. “हा कायदा केंद्र सरकारने बनवला आहे. त्यामुळे तुम्हाला हवे असलेले उत्तर केंद्र सरकारकडून मागितले पाहिजे,” असेही ममता बँनर्जी म्हणाल्या. तसेच, त्यांचे सरकार गुन्हेगारांवर कठोर कारवाई करेल असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ममता बँनर्जी म्हणाल्या की, “काही राजकीय पक्ष राजकीय फायद्यासाठी धर्माचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या समजुतीला बळी पडू नका,” असे आवाहनही यावेळी केले.

शुक्रवारी, बांग्लादेशच्या सीमेवर असलेल्या बंगाल जिल्ह्यात तीन तास चाललेल्या हिंसाचाराच्यामुळे – लूटमार, जाळपोळ आणि दुकानांना आग लावणे – पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी, खळबळ उडाली. त्या भयानक रात्रीचे वर्णन करताना, अनेक पीडितांनी सांगितले की, त्यांच्या दुकानांना लुटण्यात आले, तोडफोड करण्यात आली आणि आग लावण्यात आली तेव्हा पोलिस घटनास्थळावरून कसे अनुपस्थित होते. धुलियानमध्ये ज्यांचे दुकान जाळण्यात आले होते, त्या स्थानिकांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, “तेथे कोणतेही पोलिस अधिकारी नव्हता. ते फक्त घाबरले होते. आमच्यासारखेच त्यांच्या घरात बसले होते.”

About Editor

Check Also

जयराम रमेश यांची पंतप्रधान मोदींवर टीका, इराणवरील हल्ल्याचा निषेध करण्यातही अपयशी भारतीय सभ्यतेचा अपमान करण्यात मात्र पुढाकार

काँग्रेसने शनिवारी (२१ मार्च, २०२६) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *