चेन्नई जवळ म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघातः राहुल गांधी यांचा सवाल थांबलेल्या मालगाडीवर प्रवासी ट्रेन आदळून अपघात

चेन्नई विभागातील कावराई पेच्चई येथे रेल्वे मार्गावरील एका सिग्नल फेल झाल्याने तेथून जाणाऱ्या म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी थांबलेल्या मालगाडीवर म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेस आदळून अपघात झाला. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील गुम्मीडीपुंडीजवळ कावराईपेट्टई येथे हा अपघात झाला. अपघातानंतर म्हैसूर-दरभंगा गाडीचे अनेक डबे घसरले आणि ते अस्तावस्त स्वरूपात पडल्याचे दिसत होते. अपघाताचे वृत्त कळताच प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिक भागातील नागरिकांनी आणि प्रशासन यंत्रणांनी तात्काळ धाव घेतली. दरम्यान अपघातानंतर म्हैसूर दरभंगा एक्सप्रेसचे १३ डब्बे ट्रॅकवरून घसरले.

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी १२ ऑक्टोबर २०२४ केंद्रावर टीका करत म्हणाले की, केंद्र सरकारने रेल्वे अपघात थांबवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, अशा घटना रेल्वेच्या नियमित घटनांचे भाग बनतच चालले असल्याचा आरोप रेल्वे मंत्रालयावर केला.

दरम्यान, दक्षिण रेल्वेचे व्यवस्थापक आर.एन. सिंग यांनी सांगितले की, म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस मुख्य मार्गासाठी सिग्नल सेट असूनही लूप लाइनमध्ये प्रवेश करणारी घटना “असामान्य” होती.

सिग्नलच्या बिघाडाचा तपशील न सांगता, आर एन सिंह यांनी तिरुवल्लूर जिल्ह्यातील गुम्मुदीपूंडीजवळ कावरापेट्टई येथे झालेल्या अपघाताच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले की, गाडी थांबलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही यावेळी सांगितले. .

दक्षिण रेल्वेचे अधिकारी, विभाग प्रमुख आणि इतर रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी अपघातस्थळी ट्रॅक पुनर्संचयित करण्याचे काम सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दक्षिण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, डी. ओम प्रकाश यांनी प्रवाशांनी रेल्वे इतर मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला असून रेल्वे गाड्यांचे रिशेड्युलिंग करण्यात येत असल्याचे सांगितले.

दरम्यान या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसच्या अपघातावरून केंद्र सरकारवर टीका करत सवाल केला की, आणखी किती कुटुंबिय उद्धवस्त झाल्यानंतर सरकारला जाग येणार आहे आणि रेल्वे अपघात रोखण्यासाठी पुरेशी पावले उचलणार आहे असा सवाल केला.

राहुल गांधी पुढे आपल्या एक्सवरील ट्विट मध्ये म्हणाले की, असंख्य अपघातात अनेकांचे प्राण गेले तरीही कोणताही धडा घेतला गेला नाही आणि सरकारने जागे होण्यापूर्वी आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार आहे. उत्तरदायित्वाची सुरुवात शीर्षस्थानापासून होते असा उपरोधिक टोलाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

About Editor

Check Also

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती अस्वस्थ ? विमानातून उतरताना आणि पत्रकार परिषदेत बसताना ही आधार घेतला

डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वनच्या पायऱ्यांवरून काळजीपूर्वक खाली उतरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *