मंगळवारचा दिवस मोठा राहणार पृथ्वीचे दक्षिणायण सुरु होणार

आपणा सर्वांना माहित आहे की १२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र असते. मात्र वर्षातील एक दिवस असा असतो की त्या दिवशी दिवस हा १२ तासापेक्षा जास्त मोठा तर रात्र ही १२ तासापेक्षा लहान असते. साधारणत: पृथ्वीचे भ्रमण हे उत्तरायणाकडून दक्षिणेकडे अर्था पृथ्वीचे दक्षिणायन सुरु झाले की त्याच्या पहिला दिवस हा १३ तासाहून अधिकचा असतो. हा नैसर्गिक चमत्काराचा दिवस आपल्या सर्वांना अनुभवता येणार आहे. तो ही मंगळवारी २१ जून रोजी

याचे शास्त्रीय कारण असे की, २१ जूनला सुर्य अधिकाधिक उत्तरेस राहणार असून तो दक्षिणेकडे जाणे अर्थात उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. २१ जूनला उत्तर गोलार्थात सर्वोत मोठा दिवस असतो तर रात्र सर्वात लहान असते. मंगळवारी दिवस सव्वातेरा तासांचा तर रात्र पावणे अकरा तासांची राहणार आहे.

दररोज पूर्वेकडे उगवणारा सूर्य काहीसा दक्षिणोत्तर सरकल्याचा अनुभव येत आहे, याचे कारण पृथ्वीच्या अक्षाने तिच्या परिभ्रमण प्रतलाशी केलेला २३.५ अंशाचा कोन हे आहे. त्यामुळे सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्तापर्यंत फिरत असल्याचा भास होत असून यालाच उत्तरायण/दक्षिणायन म्हणतात. २१ जूनपासून सूर्य दक्षिणेकडे सरकून २२ सप्टेंबर या शरद संपातदिनी पुन्हा विषुववृत्तावर व त्यानंतर २२ डिसेंबरला अयनदिनी सूर्य मकरवृत्तावर आल्याने हा दिवस सर्वात लहान तर रात्र सर्वात मोठी असते.

उत्तरायणात सूर्य उत्तर गोलार्धात व दक्षिणायनात सूर्य दक्षिण गोलार्धात झुकलेला दिसतो. २१ जून या सर्वात मोठ्या दिवशी आपल्या भागात दिवस सव्वातेरा तासांपेक्षा अधिक व रात्र मात्र पावणेअकरा तासांची असते. याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मानवी शरीर व मनाचे संबंध अधिक दृढ करून निसर्गाच्या संवर्धनासाठी एकत्र यावे, असे आवाहन विश्वभारती विज्ञान केंद्रच्यावतीने करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *