अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वरील संसदीय चर्चा आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावासह दोन्ही सभागृहात सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून विरोधकांनी चर्चेची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळास सुरुवात केली.
लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाकुंभ चेंगराचेंगरी दुर्घटनेवर चर्चा करण्याचे आवाहन विरोधी पक्षांनी केल्याने वादग्रस्त चर्चा होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी, त्यांनी सांगितले की संसदेच्या अजेंड्यावर व्यवसाय सल्लागार समिती निर्णय घेईल.
केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. अधिवेशनाचा पहिला भाग १३ फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा भाग १० मार्च रोजी सुरू होईल. अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपेल. अधिवेशनाच्या कायदेविषयक अजेंड्यात वक्फ (सुधारणा) विधेयक आणि इमिग्रेशन आणि परदेशी विधेयकासह १६ विधेयके आहेत.
तर राज्यसभेत महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चेची मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी करत या चेंगराचेंगरीत हजारो लोक मेल्याचे दावा केला. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांनी विरोधी पक्षनेते कुंभमेळ्यात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याच्या दाव्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले.
त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजुजी यांनीही मल्लिकार्जून खर्गे यांना लाखा शेतकऱ्यांचा मृत्य झाल्याच्या दाव्याबाबत विचारणा केली.
Marathi e-Batmya