अमेरिकेने २१ मिलेनियम इतकी रक्कम भारतातील निवडणूकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी दिल्याची माहिती जाहिर केली. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यासंदर्भात पुन्हा एकदा पुर्नरूच्चार करत दुसऱ्या कोणाला तरी निवडूण आणण्यासाठी ही रक्कम दिल्याचेही सांगितले. मात्र अमेरिकेच्या या दाव्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रश्न उपस्थित करत तो निधी बांग्लादेशला जाईपर्यंत देशातील पंतप्रधान मोदी यांचे सरकार काय करत होते असा सवाल केला. तसेच ही रक्कम बांग्लादेशला जाईपर्यंत त्याची माहिती कशी मिळाली नाही असा सवालही यावेळी केला. तसेच प्रयागराज येथील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतकांचा आकडा लपविला असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. तसेच प्रयागराजमधील असुविधांवरूनही केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.
काँग्रेसच्या या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, “गुलाम मानसिकता” असलेले काही नेते धर्माची थट्टा करण्यात आणि लोकांमध्ये फूट पाडण्यात गुंतले आहेत, जेणेकरून देश आणि त्याची श्रद्धा कमकुवत होईल असा पलटवारही यावेळी केला.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटची पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. गेल्या महिन्यात प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून विरोधी पक्षांकडून झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, आजकाल, आपण पाहतो की काही नेते धर्माची थट्टा करतात, त्याची थट्टा करतात आणि लोकांमध्ये फूट पाडण्यात गुंतलेले आहेत.” “अनेकदा, परदेशी शक्ती देखील या व्यक्तींना राष्ट्र आणि त्यांच्या श्रद्धेला कमकुवत करण्याच्या प्रयत्नांमध्ये पाठिंबा देतात, अशी टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हिंदू श्रद्धांबद्दल द्वेष बाळगणारे हे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. गुलामीची मानसिकता असलेले (गुलामी की मनसिक्त) हे लोक आपल्या श्रद्धा, मंदिरे, संत संस्कृती आणि तत्त्वांवर हल्ला करतात. ते आपल्या सणांचा, परंपरांचा आणि चालीरीतींचा अपमान करतात. ते मूळतः प्रगतीशील असलेल्या धर्म आणि संस्कृतीवर चिखलफेक करण्याचे धाडस करतात. त्यांचा अजेंडा आपल्या समाजात फूट पाडणे आणि एकता तोडणे असल्याचा आरोपही यावेळी विरोधकांवर केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल, आपण सर्वत्र महाकुंभाबद्दल चर्चा पाहत आहोत, महाकुंभाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी “लोकांची मने जिंकणाऱ्या” स्वच्छता कामगार आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. हा एकतेचा महान कुंभ आहे जिथे हजारो डॉक्टर आणि स्वयंसेवक समर्पण आणि सेवेच्या भावनेने काम करतात. एकतेच्या महान कुंभाला भेट देणारे लोक या प्रयत्नांचे कौतुक करतात, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, याच महाकुंभात, असंख्य सामाजिक सेवा प्रकल्प राबवले जात आहेत. माध्यमांना त्यांच्याकडे लक्ष देणे कठीण आहे आणि त्यांना फारशी चर्चाही झालेली नाही. पण मी एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो – एकतेच्या या महाकुंभात, नेत्र महाकुंभ (डोळे महाकुंभ) होत आहे. या नेत्र महाकुंभात, देशाच्या कानाकोपऱ्यातील यात्रेकरू, विशेषतः गरीब कुटुंबातील लोक, त्यांचे डोळे मोफत तपासत असल्याची माहितीही दिली.
आतापर्यंत २ लाखांहून अधिक जणांचे डोळे तपासले गेले आहेत, तर सुमारे “दीड लाख लोकांना मोफत औषधे आणि चष्मे मिळाले आहेत असेही यावेळी सांगितले.
बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट, जे अंदाजे २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे आहे, १० एकर जागेत बांधले जाणार आहे, ते १०० बेडने सुसज्ज असेल, जे वंचित कर्करोग रुग्णांना मोफत उपचार देईल. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्री या कार्यक्रमात उपस्थित होते.
कर्करोगाशी लढण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुढील तीन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये कर्करोग डे केअर सेंटर उघडले जातील.
Marathi e-Batmya